March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टयाचे झुंझारराव पाटील यांना ‘कोविड योद्धा’ पुरस्कार


आष्टा / प्रतिनिधी

आष्टा येथील माजी नगराध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंझारराव शिवाजीराव पाटील यांना जायंट्स ग्रुप ऑफ आष्टा यांच्यावतीने ‘कोविड योद्धा’ पुरस्कार फेडरेशन २ क चे अध्यक्ष राजकुमार पोळ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.झुंजारराव पाटील यांनी आला. कोरोना संकटकाळात आष्टा नगरपालिका व लोकसहभागातून शहरातील गोरगरीब, निराधार, छोटे व्यवसायिक, अपंग, बेघर अशा अनेक लोकांना अन्नधान्याचे किट वाटप केले आहे.शहरात कोरोना बाबत नागरिकांच्या जनजागृती करण्याचे काम केले आहे.तसेच सातत्याने शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून कार्यरत राहिले होते. तर शहरात कोरोनाचे रुग्ण सापडल्या पासून आज पर्यंत सतत नागरिकांना मदत करणे व त्यांना आधार देण्याचे काम करत आहेत.त्यांच्या या कामाची दखल घेत जायंट्स ग्रुप च्या वतीने त्यांना कोविड योद्धा पुरस्कार देण्यातयावेळी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष समीर गायकवाड, उद्योगपती नितीन झंवर, डॉक्टर मनोहर कबाडे, राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, आर.आर.उंटवाल, एन डी. कुलकर्णी, अजय महाजन, डॉ. सतीश बापट, माजी उपनगराध्यक्ष बाबासो सिद्ध, सूर्यकांत जुगदर
या काळात उपस्थित होते.

E