The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टयात एक गाव एक गणपती नगरपरिषद गांधी चौकात श्रींची प्रतिष्ठापना

आष्टा येथे गणेश उत्सव सणानिमित्त शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर कृष्णांत पिंगळे ,तहसीलदार सुनिल शेरखाने राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, गट नेते विशाल शिंदे, एम ई सी बीचे एस एस पवार ,नगराध्यक्षा स्नेहा माळी, नगरसेवक विजय मोरे, शेरनबाब देवळे, जगन्नाथ बसुगडे ,पी एल घस्ते, अर्जून माने ,माजी नगरसेवक बाबासो सिध्द, सतीश माळी, प्रभाकर जाधव, सुनिल माने ,सदिप ताबवेकर, शकील मुजावर,युवा नेते उदय कुशिरे, सतीश बापट, समीर गायकवाड, शिवाजी चोरमुले,पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,संजय सनदी उपस्थित होते
यावेळी एक मताने नगरपरिषद गांधी चौक येथे एकच गणपती बसवणे याबाबत चर्चा झाली कोरोना सारखी जागतिक महामारी आटोक्यात आणण्यासाठी या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता घरगुती साजरा करावा याबाबत पोलिस खाते व शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला यावेेेळी 62 गणेेेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते आष्टयात एक गाव एक गणपतीचा निर्णयाचेे स्वागत केेले यावेळी कृषांत पिंगळे, वैभव शिंदे, तानाजी टकले ,सुनिल माने, बाबासो सिध्द ,भानुदास निंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले द वाळवा क्रांती न्यूजसाठी दत्तराज हिप्परकर

E

You may have missed

1 min read

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.