
लोक सहभागातून सोमेश्वर मंदिराच्या सोमलिंग तळ्याच्या स्वच्छतचे काम श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर श्री अनिल फाळके सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच सोमेश्वर मदिरमध्ये श्री सुभाष तगारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सोमेश्वरचा आशिर्वाद घेउन या कामचा शुभारंभ करण्यात आला. या भागामध्ये खूप प्रमाणात झुडपे वाढली असल्यामूळे स्वच्छतच्या कामाला वेळ लागत आहे. भविष्यामधे या ठिकानी फुलझाडे लावून तसेच तळयाची स्वच्छता करुन या भागाचे सौंदर्य वाढविण्याच प्रयत्न करण्यात येणार आहे. या ठिकानी तळ्यामध्ये बोटींग सुरु करुन भोवताली भेळ व इतर गाड्याना उभा करता येइल त्यामूळे या भागाला एक मिनी चौपाटीचे स्वरुप देता येइल व नागरिकांच्या आकर्षणाचे एक केंद्र बनेल असा एक मनोदय आहे. या मुळे आष्ट्यातील सोमेश्वर मंदिराची एक जुनी वास्तू आपण जतन करु शकू. यावेळी अंकुश मदने, राजेंद्र मळणगावकर, बाबासाहेब औताड़े, आण्णा घोरपडे,सुभाष जाधव, आण्णा सावळवाडे, सुरेश पुजारी, झांबरेगुरुजी, जे टी भंडारे, संग्राम शिंदे, अशोक मदने, वसंत कांबळे, प्रसाद देसाई, शहाजान जमादार, नामदेव विरभक्त उपस्थित होते