The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टा नगरपरिषदचे मुख्याधिकारी मा हेमंत निकम यांच्या निरोप समारंभावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू.

आष्टा प्रतिनिधी

आष्टा नगरपरिषदचे मुख्याधिकारी मा हेमंत निकम यांची बदली रोहा नगरपालिका कडे बदली झाली आष्टा नगरपालिकेच्या वतीने त्याचा निरोप समारंभ काकासो शिंदे सभागृहात घेण्यात आला यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते यावेळी मुख्याधिकारी कैलास चव्हाण जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुझारराव पाटील  उपनगराध्यक्षा सौ मनिषा जाधव ,नगरसेवक जगन्नाथ बसुगडे ,शेरनबाब देवळे ,माजी नगरसेवक सतीश माळी,प्रभाकर जाधव,नगरपालिका अधिकारी आर एन कांबळे ,गिरिष शेंडगे, एस डी कांबळे ,आनंदा कांबळे ,संतोष खराडे ,शहजान शेख ,श्रीधर डुबले , श्रीमती आसावरी सुतार, सरिका खोत, प्रज्ञा यादव, व पी बी हाबळे, शिरिष काळे ,प्रमोद खोद्रे, सुधीर कांबळे, संजय पाखरे, दिलीप ढोले, सह पत्रकार सुरेद्र शिराळकर ,गजानन शेळके,उत्तम कदम, दत्तराज हिप्परकर, रवि पाटील उपस्थित होते.यावेळी झुझारराव पाटील म्हणाले हेमंत निकम यांनी प्रशासन व राजकीय सामजिक, सह इतरांचा मेळ घालून त्यांनी शहरात उत्तम काम केले आहे महापुर ,कोरोना मध्ये प्रशासन कसे काम करीत हे दाखवून दिले तसेच या काळात चांगले काम केले आहे कर्मचारी याच्या पाठशी नेहमी उभे राहणार साहेब म्हणुन ओळख निर्माण केली आहे हेमंत निकम म्हणाले गाव करेल ते राव काय करेल यांची प्रचिती आष्टा शहरात पाहयला मिळले चांगल्या गावात काम करण्याची संधी मिळेल शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने कोरोनामध्ये चांगले काम करता आले यावेळी अनेकांच्या  कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते  

E

You may have missed

1 min read

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.