January 21, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टा नगरपरिषदच्या वतीने आष्टा मळे भागातील रस्ते व दोन बगीच्यासाठी दिलेल्या निधीबद्दल पालकमंत्री जलसंपदा मंत्री ना जयंतरावजी पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला

आष्टा प्रतिनिधी

आष्टा नगरपरिषद आष्टा यांच्यावतीने आष्टा शहरातील मळे भागातील रस्त्यांसाठी व शहरातील दोन बगीच्यासाठी दिलेल्या निधीबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला या निधीमध्ये महात्मा गांधी शाळा (भिमराव मस्के घर) ते कोटीवाणी बस्ती रस्ता खडीकरण करणे ,बावची बागणी रस्ता ते धनवडे मळा रस्ता खडीकरण करणे
नाना मोरे घर पुर्व (घाटगे मळा) ते पोपट जगताप रस्ता डांबरीकरण करणे
वुड लँड धाब ते साळुखे आंबा पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे
शेळके मळा ते हिरूगुडे पानंद रस्ता डांबरीकरण करणे ,विश्वास खोत घर ते सुरेश गायकवाड घर रस्ता खडीकरण करणे,अहिल्यादेवी सोसायटी ते दुधगांव शिव पर्यंत रस्ता खडीकरण करणे (दादा सावळवाडे मळा ते निखील सावळवाडे मळा पर्यंत
राहुल मोरे घर ते लाळगे मळा रस्ता डांबरीकरण करणे,मिरज वेस ते कळसाप्पा मळा (ओढा) डांबरीकरण करणे,हिंदू स्मशानभूमी ते सावंत रस्ता डांबरीकरण करणे वाळवा रोड ते बाळासाहेब आर्गडे मळा डांबरीकरण करणे,डिग्रजकर वस्ती ते घाडगे मळा रस्ता खडीकरण करणे,महिमान मळा ते माने वस्ती रस्ता डांबरीकरण करणे दुधगांव रस्ता ते वाडकर वस्ती (रोजावाडी रस्ता) रस्ता डांबरीकरण करणे,राममंदिर येथे लहान मुलांचा बगीचा विकसित करणे,शिराळकर कॉलनी येथे बगीचा विकसित करणे असे एकुण 5 कोटी 50 लाखांचे कामे होणार आहे यावेळी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते माननीय वैभव दादा शिंदे, सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य माननीय झुंजारराव दादा पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.विराज दादा शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक मा.दिलीपरावजी वग्याणी, राजारामबापू दूध संघाचे संचालक मा.संग्राम फडतरे, आष्टा नगर परिषदेचे पक्षप्रतोद मा. विशाल भाऊ शिंदे, आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष मा.सौ मनीषा जाधव, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्‍हाण, आरोग्य सभापती मा.शेरनबाब देवळे, नगरसेवक मा. जगन्नाथ बसुगडे, नगरसेवक मा.अर्जुन माने,नगरसेवक मा.विकास बोरकर, मा. प्रभाकर जाधव, मा.सतीश माळी, मा.अंकुश मदने, मा.अनिल बोंडे, मा.रामचंद्र औघडे उपस्थित होते

E