E

June 7, 2023

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह शहरात खळबळ

आष्टा प्रतिनिधी

आष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह आला असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर व्यक्ती राहत असलेल्या परिसर आष्टा नगरपालिका आष्टा ग्रामीण रुग्णालय आष्टा पोलिसांनी सदर परिसर हा कंटेनमेंट झोन केला असून त्यांच्या संपर्कातील लोकांची नावे घेऊन त्यांना होम करण्यात येत आहे गेले सहा महिने या शहरांमध्ये कोरोनाचा कोणताच रुग्ण आढळून आला नव्हता सदर कोरोना पॉझिटिव व्यक्तीचा जनरल स्टेशनरी व स्नेहसंमेलनासाठी कपडे पुरवण्याचा व्यवसाय होता आष्टा शहरांमध्ये कोरोनााचा
शिरकाव झाला आहे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सदर भागामध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे तसेच सदर चा परिसर सील करून कंटेनमेंट झोन केला आहे कोरोना रुग्ण सापडल्याने आष्टा शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.