
आष्टा नगरपालिकेच्या नामदार जयंत पाटील गटाचे स्विकृत नगरसेवक पदी विकास बोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी बाळासाहेब पाटील शहरातील जेष्ठ नेते विराज शिंंदे दिलीप वग्याणी बबनराव थोटे रघुुनाथ जाधव संंग्राम फडतरे माणिक शेेळके उपस्थित होते
दि 17 जुलै रोजी अर्ज दाखल तर 20 जुलै रोजी निवडणुक होणार आहे स्विकृत नगरसेवक पदासाठी विकास बोरकर, धैर्यशील थोरात,पंडीत बसुगडे, रणजित पाटील नवनाथ घाडगे, सुनील जाधव, जैैन समााज्याचे सचिन चौगुले ,अभिजित वग्याणी, तर महाविकास आघाडी चे पालन करीत काँग्रेसचे विनय कांबळे हे ही स्विकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक होते आष्टा येथील झालेल्या बैठकीत पहिले नऊ महिने विकास बोरकर तर नंतर नऊ महिने धैर्यशील थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दीपक मेथे यांचा 6 जून रोजी नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला आहे यापूर्वी विकास बोरकर यांना संधी देण्याचे ठरले होते तसेच धैर्यशिल थोरात यांनी देखील नामदार जयंत पाटील यांना भेटुन संधी मिळावी अशी मागणी केली होते विकास बोरकर व धैर्यशिल थोरात यांना बरच वर्षी स्वीकृत नगरसेवक पदासाठी वाट पाहावी लागली होती आज आष्टा येथे झालेल्या बैठकीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील यांनी विकास बोरकर व धैर्यशील थोरात या दोन नावावरती नऊ ,नऊ महिने संधी देण्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले