December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टा नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणुकीचे वातावरण पेटले असून 15 ऑगस्टनंतर कोणाच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडणार.

आष्टा  नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ मनिषा जाधव यांच्या पदाचा कार्यकाल संपला असून इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या भेटीगाठी वर भर देत आपल्या पदरात उपनगराध्यक्ष पद पाडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या आष्टा शहरांमध्ये दिसत आहे आष्टा  नगरपरिषद मध्ये स्व विलासराव शिंदे व नामदार जयंत पाटील यांच्या गटांची संयुक्त अशी सत्ता आहे या नगरपालिकेमध्ये तीन वर्षे  स्व  विलासराव शिंदे गटाला उपनगराध्यक्षपदी तर दोन वर्षे नामदार जयंत पाटील गटाला उपनगराध्यक्ष पद देण्याचे अलिखित करार आहे या करारानुसार नामदार जयंत पाटील गटातून यापूर्वी रुक्मिणी अवघडे व पी एल घस्ते यांना नामदार जयंत पाटील यांनी संधी दिली होती तर उर्वरित एका वर्षामध्ये सौ मनीषा जाधव यांना सहा महिन्यासाठी संधी देण्यात आली होती पुढील सहा महिन्यासाठी नामदार जयंत पाटील गटातून सौ पुष्पलता माळी, अर्जुन माने, तेजश्री बोंडे ,जगन्नाथ बसुगडे ,विजय मोरे नाना,हे इच्छुक आहेत नामदार जयंत पाटील हे जैन समाजातील तेजश्री बोर्डे यांना संधी देऊन त्या समाजाला आता तरी न्याय देतील का ? अशी ही चर्चा सध्या शहरात सुरू आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते माजी नगरसेवक सतीश माळी यांच्या पत्नी सौ पुष्पलता माळी यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून मळे भागांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे त्याचबरोबर कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे अर्जुन माने यांना  आतातरी संधी भेटणार का ? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील यांचे विश्वासू व एक निष्ठ कार्यकर्ते युवा नेते अनिल बोंडे यांच्या पत्नी तेजश्री बोंडे याही उपनगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत  त्यांनाही संधी देऊन  दिलीप तात्या पाटील व नामदार जयंत पाटील हे  जैन समाजाला संधी देतील का  अशी चर्चा आष्टा शहरांमध्ये सुरू आहे मिसळवाडी भागातील जगन्नाथ बसुगडे हे या पदासाठी इच्छुक असून त्यांनी गावातील ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे उप नगराध्यक्ष पदासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे ,आष्टा पीपल बॅंकेचे माजी चेअरमन दिलीप वाग्याणी,  शेतकरी विणकरी सूतगिरणीचे चेअरमन बबनदादा थोटे ,राजारामबापू पतसंस्थेचे रघुनाथ जाधव ,राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे ,राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक माणिक शेळके यांच्या बैठकीनंतर कोण होणार आष्‍टा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष हे कळणार आहे यापदासाठी सौ पुष्पलता माळी ,अर्जुन माने ,तेजश्री बोंडे, जगन्नाथ बसुगडे या चौघांच्या भांडणात विजय मोरे नाना किंवा  उपनगराध्यक्षा सौ मनीषा जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कोरोनाच्या महामारी मध्ये व पावसात सुद्धा आष्टा नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणुकीचे वातावरण पेटला असून 15 ऑगस्टनंतर   कोणाच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडणार  या बाबत आष्टा शहरात चर्चा सुरू आहे 
फोटो घेणे सौ पुष्पलता माळी ,अर्जुन माने, तेजश्री बोंडे विजय मोरे, जगन्नाथ बसुगडे 

E

You may have missed