December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आश्रम शाळेचा निकाल 97% लागला. सायली पवार विद्यालयात प्रथम

आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आश्रम शाळेचा निकाल 97% लागला सायली पवार विद्यालयात प्रथम आष्टा येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 97 टक्के लागला सायली पवार 95 टक्के, प्राची बोते  92% ,कविता माने 91 टक्के गुण मिळवून यशस्वी ठरले 16 विद्यार्थी प्रथम श्रेणी व सात विद्यार्थी सेकंड क्लास घेवून शाळेचा नावलौकिक वाढवला या यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे संस्थेचे सचिव राजेंद्र उर्फ चिमण भाऊ डांगे कार्यकारी संचालक  आर ए कनाई यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेचे उपाध्यक्ष संपतराव पाटील व्यवस्थापक सुनील शिनगारे प्रशासकीय अधिकारी शंकर स्वामी यांनी विद्यार्थ्यांचे व  शिक्षकांचे विशेष कौतुक केले माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शना खाली व सचिव चिमण डांगे यांच्या प्रेरणेने आश्रम शाळा आष्टा शहरांमध्ये गेले पंचवीस वर्षे अत्यंत चांगल्या प्रकारे ज्ञान दान देण्याचे काम करीत आहे या शाळेतून आजवर अनेक विद्यार्थी घडले आहेत आश्रम शाळेचे विशेष कौतुक सर्व स्तरातून होत आहे यावेळी मुख्याध्यापक रघुनाथ बोते, संतोष गावडे ,अधिक कुटे ,आशाराणी माळी ,उज्वला गावडे, संदीप कांबळे, अमोल यादव ,व ए के पाटील उपस्थित होते दहावीच्या वर्गशिक्षिका सविता पाटील यांनी सर्व विषयांचे शिक्षकांचे आभार मानून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले

E

You may have missed