आष्टा प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यावर निबंध घातले होते यामुळे लाभांश देणे अडचणीचे झाले होते. याकरीता महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातुन पाठपुरावा करून सहकारी कायदयामध्ये दुरुस्ती करून संचालक मंडळ सभेस अधिकार दयावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले होते या लढयास यश येऊन चालू वर्षाकरीता लाभांश वितरणाचा अधिकार संचालक मंडळ सभेस दिलेचा अध्यादेश नुकताच प्राप्त झाला. यावरती लगेचच मा.संचालक मंडळाची सभा घेवून नफा विभागणी करून लाभांशाची घोषणा करणेत आली. यामुळे संस्था स्थापनेपासुन सातत्याने प्रतिवर्षी लाभांश वितरित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.मार्च २०२० अखेर संस्थेस २ कोटी ३८ लाखाचा निव्वळ नफा झालेला आहे .संस्थेच्या दृष्टीने योग्य ती विभागणी करून हा लाभांश जाहीर करणेत आला असल्याची माहिती संस्थेचे संचालक मा. श्री . आर. आर.उंटवाल यांनी दिली. संस्थेकडे आँक्टोबर २०२० अखेर १५१ कोटी ठेवी ,१०७ कोटीचे कर्जवितरण, ६७ कोटीची सुरक्षित गंतवणुक केलेली आहे. ८५४० सभासद संख्या व ४ कोटी ९२ लाखाचे भागभांडवल जमा असून स्वनिधी २४ कोटी २५ लाखाचा झालेला आहे. संस्थेचे नेट एनपीए शुन्य टक्के राखण्यात संस्थेस सतत यश मिळालेले आहे.
संस्था अर्थव्यवहाराबरोबर काळाची पावले ओळखुन एन ई एफ टी व आर टी जी एस सुविधा ग्राहकांना पुरवित आहे. कर्जाचे व्याजदर कमी करून शेतक-यांना सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नरत आहे. दसरा दिपावलीच्या निमित्ताने अल्प व्याजदरात सोने तारण तसेच वाहण तारण कर्जर्ची उपलब्धता करून दिली असलेची माहिती संस्थेचे संचालक श्री. सुभाषचंद्र झंवर यांनी दिली.यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. अजिज मुजावर ,व्हा.चेअरमन श्री दिपकराव साठे, संचालक श्री. सुभाषचंद्र झंवर, श्री. धनपाल चौगुले, श्री. रामनारायण उंटवाल ,श्री. शिवाजीराव शिंदे ,श्री विठ्ठल तळवलकर, श्री.भाऊसो लोहार, श्री. राजेंद्र मळणगांवकर, श्री. राजाराम शेळके, श्री. अरविंद महाजन, सौ अनुराधा झंवर, श्रीमती रंजना पाटील ,तज्ञ संचालक श्री गणपती जाधव ,श्री . सर्जेराब तांबवेकर व जनरल मँनेजर श्री. एन.बी.काळोखे उपस्थित होते.