December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टा शहरातील कोरोना रुग्ण संख्या 21 तर 5 जणांनी केली कोरोना वर मात 2 जणांचा मृत्यू .

आष्टा शहरात. कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसा दिवस वाढ होत चालले आहे आष्टा येथील कोटेश्वर मंदिरा नजीक पती-पत्नी चा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोना रुग्ण संख्या 21 झाली आहे 5 जणांनी कोरोना वर मात केली असुन 2 जणांचा मृत्यू झाला आहे सदर परिसरामध्ये आष्टा नगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आले आहे गेले चार ते पाच महिने शहरांमध्ये कोरोनाचा एक रुग्ण सापडला नव्हता पण गेल्या महिन्यापासून आष्टा शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चा आलेख वाढत चालला आहे आज कोटेश्वर मंदिरानजीक पती-पत्नींचा कोरोना रिर्पाट पॉझिटिव्ह आला आहे पती हा वाळवा येथील एका बँकेत नोकरीस आहे तर पत्नी सांगली येथील एका महाविद्यालया मध्ये नोकरीस आहेत नगरपालिकेच्या वतीने योग्य ती पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे
मुख्याधिकारी हेमंत निकम अपर तहसीलदार सुनील शेरखाने आष्टा नगर परिषदेचे आर एन कांबळे संतोष खराडे, ए बी पाखरे सुजाता खोत , सचिन मोरे, सुधीर कांबळे यांनी भेट दिली तर नगररपालिकेचे कर्मचारी लखन लोंढे,पाडुरंग पेटारे योगेश कांबळे संजय भंडारे चद्रकांत काबळे,सुखदेव टोमके, दिलीप औघडे,भिमराव वरणे,बापु घस्ते,यांनी औषधे फवारणी केली आहे आष्टा शहरात कोरोना ची वाढती संख्या लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आव्हान नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे

E

You may have missed