The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टा शहरातील सर्व च रोगावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स असोसिएशन कटिबध्द: डॉ प्रविण कोळी

आष्टा प्रतिनिधी

आज संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. आष्टयामधे पण कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज शहरातील आष्टा डॉक्टर्स असोसिएशन व आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण आहे. सद्य परिस्थितीत कोरोना ग्रस्त रुग्णाना बेड मिळत नाहित. या मुळे कोरोना व्यतिरीक्त इतर रोगाच्या रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकामध्ये तक्रारी आहेत. डेंगु, चिकनगुनीया सारख्या रोगांच्या रुग्णांची संख्या पण जास्त आहे. यासंदर्भात कै बापुसो शिंदे बहू उद्देशीय सेवाभावी संस्थेने आष्टा डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ प्रविण कोळी यांच्याशी आज चर्चा केली. यावेळी आज डॉक्टरांच्या समोर असणाऱ्या समस्या बाबत त्यानी माहिती दिली. आज शहरातील काही डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात लोकसंख्या 40000 व डॉक्टर 40 त्यात काही डॉक्टरच पॉझिटिव्ह असल्यामूळे इतर डॉक्टरांच्या वर ताण वाढला आहे. बरेच लोक पण दवाखान्यात येताना मास्क वापरत नाहीत, रुग्ण व नातेवाईक सामाजिक अंतर राखत नाहीत. त्यामूळे डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबियांचे पण आरोग्य धोक्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार डॉक्टरांना कोविड सेंटरला पण काम कराव लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आष्टा ग्रामीण रुग्णालय येथे असणाऱ्या कोविड सेंटर मध्ये सर्व खासगी डॉक्टर्स तीन शिफ्ट मध्ये रात्रंदिवस सेवा देत आहेत. तसेच पुन्हा इतर वेळी स्वतःच्या हॉस्पिटल मधील रुग्णाच्यावर पण उपचार करत आहेत. त्यातच प्रशासनाने, नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणारी आष्टा क्रिटीकेअर हॉस्पिटल आणि स्पंदन हॉस्पिटल ही दोन खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेतल्याने डेंग्यू, चिकनगुनीया, टायफॉइड, कावीळ, या साथीच्या रोगांवर तसेच मधुमेह, रक्तदाब, heartattack, लकवा या सारख्या आजारावर उपचार करणे अवघड होत आहे. तरीही अशा वैश्विक संकटात आष्टा डॉक्टर्स असोसिएशन आपल्या शहरात रुग्णांसाठी उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वथा कटिबध्द आहे, आणि शिवाय जर डॉक्टर पॉझिटीव्ह आले तर त्यांचे हॉस्पिटल बंद ठेवण्यात येत आहे. त्यामूळे रुग्णांवर उपचाराबाबत अडचणी येत आहे. डेंगू व चिकन गुनिया रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामूळे या रुग्णाना उपचारासाठी दाखल करुन घेताना त्यांची कोरोना चाचणी करणे ही पण आताच्या काळात आवश्यक बाब बनली आहे. त्यामूळे डॉक्टरांच्या वर या सर्व गोष्टीचा प्रचंड ताण येत असल्या बद्दल अध्यक्ष डॉ प्रविण कोळी यानी संगितले. या परिस्थिती मध्ये पण डॉक्टर्स देखील रुग्णांसोबत, रुग्णांसाठी रात्र दिवस या रोगाशी लढत आहेत. अशा परिस्थिती मध्ये नागरिकांनी पण डॉक्टरांची बाजू समजून घ्यावी अशी विनंती डॉ प्रविण कोळी यानी केली आहे. अशा कठीण परिस्थिती मध्येही डॉक्टर्स इतर रोगावर पण उपचार देत आहेत असे त्यानी संगितले. या बाबत शासन स्तरावरुन पण प्रयत्न होण्याची गरज आहे. लवकरच आष्टा शहरातील कोरोना रुग्णांसाठी, आष्टा क्रिटी केअर हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, आणि कृष्णामाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या आष्टा येथील मा श्री अण्णासाहेब डांगे मेडीकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये आष्टा कोविड सेंटर सुरू होत आहे. हे कोविड सेंटर सुरू झाल्यास आष्टा शहरातील आष्टा क्रिटी केअर हॉस्पिटल आणि स्पंदन हॉस्पिटल ही दोन हॉस्पिटल्स सर्व नॉन कोविड म्हणून पूर्ववत कार्यान्वित होतील. त्यामुळे शहरातील नॉन कोविड रुग्णांचे होणारे हाल थांबेल. नागरिकांनी सहकार्य केले तर नक्कीच या साथीवर मात करता येईल असे मत ही आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रविण कोळी यांनी व्यक्त केले.

E

You may have missed

1 min read

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.