भारतीय जनता किसान मोर्चा आयोजीत किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ आ.अशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थित आज इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील येडेमच्छिंद्र येथुन होत आहे. यावेळी इस्लामपुर विधानसभा मतदार संघात आ.अशिष शेलारसाहेब यांचे स्वागत सर्वप्रथम उरूण – इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांचे हस्ते इस्लामपुर विधानसभा भाजपाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील भाजपा बांधणीचे आ.शेलारसाहेबांनी कौतुक केले,गेल्या तीन – चार वर्षात या मतदार संघात भाजपा विचाराच्या नागरीकांचे संघटन हे भाजपाची ताकत वाढविणारे असुन,समाजकारण,शिक्षण,आरोग्य व राजकारणातील काम आदर्श असल्याचे सांगत कोरोना काळात प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने केलेले काम हे रुग्ण व नातेवाईकांना धीर व आधार देणारे ठरले असल्याचे सुतोवाच आ.शेलार यांनी या भेटीच्या संवादावेळी केले.
गत नगरपालिका निवडणुक व विधानसभा निवडणुकीतील मताधिक्याचा आढावा घेऊन इस्लामपुर नगरपालिका सत्तांतरानंतर रखडलेल्या अनेक योजना व विकास कामे मार्गी लावल्याबद्दल निशिकांतदादांचे कौतुक केले.यापुढे भाजपा पक्ष वाढविण्यासाठी लागेल ती मदत करू व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना ताकत दिली जाईल असे यावेळी भेटी दरम्यान सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (बाबा),आ.गोपीचंद पडळकर,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रोहीत पाटील उपस्थित होते.