December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

इस्लामपुर पुन्हा तीन दिवस ‘लॉकडाऊन’ रविवार दि. २३ ते मंगळवार दि.२५ ऑगस्ट शहरातील सर्व व्यवहार बंद.

इस्लामपूर विशेष प्रतिनिधी

इस्लामपूर शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपुरात पुन्हा तीन दिवस पूर्ण ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे. रविवार दि. २३ ते मंगळवार दि.२५ ऑगस्ट या काळात शहरातील पूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. अशी घोषणा प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी केली. प्रशासकीय अधीकारी, नगरपालिका प्रशासन, नगरसेवक व पोलीसप्रशासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकित हा निर्णय घेण्यात आला.इस्लामपूर शहरात कोरोनाबधित रुग्ण आढळल्यानंतर, रेठरेधरण येथील वृद्ध रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह तसेच निगडी येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात तीनदिवसीय लॉकडाऊन पाळण्यात आला होता. इस्लामपूर शहरात बुधवारी तहसीलदार, नगरसेवक, डॉक्टर, पोलीस अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी दिवसभरात वाळवा तालुक्यात 18 कोरोना पॉजीटिव्ह असून त्यापैकी 10 बाधित इस्लामपूर शहरातील आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची ही चौथी वेळ शहरावर आली आहे. प्रांताधिकारी नागेश पाटील म्हणाले, इस्लामपूर शहर कोरोनामुक्त झाले होते. परंतु पुन्हा शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुन्हा शहर तीन दिवस लॉकडाऊन राहणार आहे. मेडिकल व दुध काही ठराविक ठिकाणीच सुरू राहतील.
पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तीन दिवसीय कडक लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे. नियम व कायद्याचे उल्लंघन झाल्यास पोलीस कोणतीही गय करणार नाहीत. लॉकडाऊन नंतर बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल.

E

You may have missed