आष्टा प्रतिनिधी
संपुर्ण जगाची कोरोना सारख्या अदृष्य विषाणुशी लढाई सुरु आहे,गेल्या सहा महीण्यापासुन या लढाईत प्रत्येक नागरीक स्वत: ची व कुटुंबाच्या सुरक्षेकडे लक्ष देत लढत आहेत.ऑगस्ट पासुन ही लढाई प्रत्येकाच्या दरवाज्यापर्यत येऊन ठेपली आणि सर्वांना हि लढाई लढावी लागली, अनेक रूग्ण उपचारा विना हाॅस्पिटलच्या दारातच थांबुन राहात असल्याने चित्र इस्लामपुर शहरासह तालुक्यात दिसु लागले.या रूग्णांवर उपचार व्हावेत एक ही रूग्ण दुर्लक्षीत राहू नये यासाठी उरूण- इस्लामपुर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील (दादा) यांच्या कल्पनेतुन उरूण- इस्लामपुर शहरात पाच फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आली.या क्लिनिक मधुन पाचशे हुन अधिक रुग्णांनी प्राथमिक उपचार घेतले आहेत.
ऑगस्ट महिण्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली.यामुळे कोरोणा रूग्णासह किरकोळ शारिरीक तक्रार (नाॅन कोविड) असणार्या रूग्णांची ही संख्या वाढु लागली मात्र या रूग्णांवर कोणी उपचार करण्यास तयार होत नसल्याने ही एक वेगळीच समस्या निर्माण झाल्याने प्रशासन,आरोग्य विभागासमोर प्रश्न उभा राहीला.या नाॅन कोविड रूग्णांवर उपचार करण्यास कोणी डाॅक्टर तयार होत नसल्याने रूग्ण व नातेवाईक ही सैरभैर होत होते व प्रशासन व आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त करत होते.
या सर्व परिस्थिती अनुभवुन अनेक शहरातील नागरीक उरूण- इस्लामपुर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील (दादा) यांना भेटले व प्रत्येक रुग्णाची तपासणी होऊन उपचार होणे आवश्यक असल्याची विनंती केली.यावर तात्काळ शहरात पाच फिव्हर क्लिनिक रुग्णांच्या प्राथमिक उपचारासाठी सुरु करण्याची कल्पना मांडुन शहरातील आचार्य जावडेकर हायस्कुल,क्लब हाऊस ,नाकील क्लिनिक,शिवाजी चौक,उरुण,निनाई नगर,जनता विद्यालय,महादेव नगर आदि ठिकाणी प्रकाश क्षैशणिक व वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ वैद्यकीय नियुक्त सेवा सुरु केली.आज जवळपास ५०० अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला.
या फिव्हर क्लिनिकमुळे नाॅन कोविड रुग्णांची तपासणी होऊन उपचार होऊ लागले,आरोग्य व प्रशासनावरील ताण कमी होऊन रुग्णांची व नातेवाईकांची होणारी गैरसोय ही दुर झाली असुन या क्लिनिकच्या सेवेमुळे रूग्ण व नातेवाईकांच्यातुन समाधान व्यक्त होताना दिसत आहे.