July 30, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

उरुण इस्लामपुर शहर भाजपा च्या वतीने किल्ला स्पर्धा

उरुण इस्लामपुर शहर भाजपा च्या वतीने किल्ला स्पर्धा
इस्लामपुर शहर भाजपाच्या वतीने उरुण इस्लामपुर शहर कार्यक्षेत्र मर्यादित स्वप्नातला किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन, विजेत्यांना रोख रक्कम आणि निशिकांतदादा चषक बक्षीस म्हणुन देण्यात येणार असल्याची माहीती उरुण इस्लामपुर शहर भाजपाचे अध्यक्ष अशोकराव खोत यांनी दिली.
सध्या कोरोनाचे संकट असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वर्षानुवर्षे वाचता यावा,त्यांचा पराक्रम प्रात्यक्षीकदृष्ट्या अनुभवता यावा व नव्या पिढीला त्या इतिहासाची नव्याने ओळख व्हावी यासाठी दिपावली ला बालगोपाळापासुन तरुण ते वयोवृध्दा पर्यत सर्वजण किल्ला करण्यात मग्न असतात या सर्वाचा उत्साह कायम रहावा व अधिक चांगल्या चांगल्या किल्ल्याच्या प्रतिकृती तयार करुन सर्वाना पाहता याव्यात यासाठी नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणुन उरूण इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील (दादा) यांच्या कल्पनेतुन ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहीती संयोजकांनी दिली.
नांव नोंदणी सुयश पाटील मोबा.नं 8600500167 सतेज पाटील मोबा नं7796119999 अक्षय कोळेकर मोबा.नं 9850019181धनराज पाटील मोबा.नं 9184360993 विकास परीट मोबा.नं. 9834401414 यांच्याकडे करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले असुन, पहील्या अनुक्रमे तीन विजेत्यांना ५०००,३०००,२००० अशी रोख रक्कम व निशिकांतदादा चषक बक्षिस म्हणुन देण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा.स्पर्धा यशस्वी साठी भाजपा संघटन सरचिटणीस प्रविण परीट,रोहीत खोत,मुकुंद रास्कर,फिरोज पटेल,शुभम पाटील,प्रशांत जाधव,प्रसाद पाटील, आदिसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.

E