March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

उरूण-इस्लामपुर नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी अरविंद माळी यांचे स्वागत तर माजी मुख्याधिकारी यांचा निरोप समारंभ संपन्न


उरूण इस्लामपुर नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांची पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी बदली झाल्याने पालघर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी उरुण- इस्लामपुर नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला. आज नगरपालिका सभागृहात दोन्ही अधिकार्‍यांचा सन्मान उरूण – इस्लामपुर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रज्ञा पवार म्हणाल्या शहरात केलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले व गेल्या वर्षीचा महापुर व यावर्षीचा कोरोना या दोन्ही संकटात ही शहरवासिय, लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,नगरपालिका अधिकारी,कर्मचारी यांचे लाभलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांच्या सहकार्यामुळेच शहरावरील कोरोनावर मात करता आली.यापुढे ही शहराच्या प्रगतीसाठी माझे सदैव सहकार्य राहील.
यावेळी नुतन मुख्याधिकारी अरविंद माळी म्हणाले शहराचा इतिहास हा संपुर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे,शहराची विकासात्मक वाटचाल सुरु असुन लोकप्रतिनिधी,नागरीक व प्रशासन यांची सांगड घालुन शहराच्या विकासात्मक वाटचालीत भर घालणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणाले शहराला गेल्या अनेक वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे,तालुक्याचे अर्थिक व विकासाचे केंद्र असुन अनेक योजना व विकासकामे मार्गी लागली आहेत.काही योजना व विकासकामे ही प्रलंबीत आहेत ती लवकरच मार्गी लागतील,नेहमी नगरपालिका प्रशासन अधिकारी ,कर्मचारी,लोकप्रतिनिधी व नागरीकांचे चांगल्या कामासाठी सहकार्य लाभले आहे.भविष्यातील इस्लामपुर शहर एक विकासाचे माॅडेल बनविण्यासाठी नुतन मुख्याधिकारी अरविंद माळी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभेल.
यावेळी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे,नगरसेवक वैभव पवार,माजी नगरसेवक भास्कर कदम ,नगरपालिका प्रशासन अधिकारी,विभागप्रमुख,कर्मचारी उपस्थित होते.

E