आष्टा प्रतिनिधी-ओरोस येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्री मुंबईकडे जाणारा सहा चाकी टेम्पो (एमएच-०७/ एजे १५३०) मध्ये गोवा बनावटीच्या ९ लाख ९३ प्रकारच्या दारूचे २०७ बॉक्स हजार ६०० रुपयांच्या बिगर परवाना जात असल्याचे महिती मिळाली होती ओरोस- खर्येवाडी येथे केलेल्या कारवाईत एकूण २१ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सावंतवाडी- कोलगाव येथील नारायण भगवान गिरी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला स्वराज माझदा कंपनीचा १२ लाखाचा सहा चाकी टेम्पोही जप्त करण्यात आला. जिल्हा अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक राज्य उत्पादन निरीक्षक एस के. दळवी, निरीक्षक यु एस. थोरात, निरीक्षक डी. एम. वायदंडे, पी. एस. माळी, जवान आर. एस.शिंदे
आदींनी ही कारवाई केली.अधिक तपास थोरात करत आहेत.

ओरोस येथे दहा लाखांची दारू बनावटी दारू करून आरोपी समवेत उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचे निरीक्षक एस के. दळवी, निरीक्षक यु एस. थोरात, निरीक्षक डी. एम. वायदंडे, पी. एस. माळी, जवान आर. एस.शिंदे व इतर