December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

कृष्णानगर,हाळ गावामधील वीर जवान, पोलीस अधिकारी व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार – सदिप सावंत

कृष्णानगर,हाळ गावामध्ये वीर जवान, पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या आई वडिलांचा सत्कार..
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी भारतीय जनता पार्टी तर्फे कृष्णा नगर, हाळ गावातील देशाच्या रक्षणाकरिता जे जे शूर जवान सीमेवरती कार्यरत आहेत, तसेच पोलीस अधिकारी या कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये देखील आपले कर्तव्य बजावत आहेत त्या सर्वांच्या घरी जाऊन शूर जवानांचा तसेच त्यांच्या माता-पित्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला व आभार मानले.कारण त्या मातापित्यांनी त्या मुलांना घडवून देशाच्या रक्षणासाठी पाठवले ही एक देशासाठी, गावासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
सैनिक मित्र त्यांचे माता पिता यांना अतिशय आनंद झाला, युवा सैनिका मधून युवा चेतना दिसल्या देशाप्रती असणारे प्रेम ,गावाकडची ओढ कुटुंबावर असणारा प्रेम,हे सर्व त्यांच्या नजरेत आम्हाला दिसत होतं. त्यांच्याकडूनही आम्हाला खूप प्रेरणा मिळाली.
पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र विशालभाऊ पाटील यांनी देखील या कोरोणासारख्या महाभयंकर संकटामध्ये मुंबई येथे महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या सेवेतून बजावली यासाठीदेखील त्यांचेही योगदान देशासाठी मोलाचे आहे म्हणून त्यांचा उचित सत्कार आम्ही केला..भाजपा कारंदवाडी कृष्णानगर यांच्या तर्फे भाजपा संघटन सरचिटणीस संदीप सावंत प्रकाश हॉस्पिटलचे म
मानदसंचालक अनिलभाऊ सरदेशमुख सहसंचालक किरण पाटील सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेले संदीप कोकरे, तेजस सूर्यवंशी, मोहन पाटील,शशिकांत पाटील इतर अनेक कार्यकर्ते सत्कारप्रसंगी उपस्थित होते..

E

You may have missed