कोनोली सरपंचपदी दिपाली कांबळे यांची बिनविरोध निवड
म्हासुर्ली प्रतिनिधी

कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी ) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली प्रदीप कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी देविदास तारडे होते. कोनोली ग्रामपंचायतीच्या अगोदरच्या सरपंच वरती इतर सदस्यांनी अविश्वास ठराव आणल्याने सुमारे एक वर्षापासून सरपंचपद रिक्त होते.तसेच अविश्वास ठरवानंतर गेले काही महिने कायदेशिर वादविवाद सुरू होते.मात्र त्यात अविश्वास दाखल केलेल्या सात सदस्यांच्या बाजूने निकाल लागल्याने नवीन सरपंच निवडीकडे साऱ्या पंचक्रोशीचे लक्ष लागून होते. मात्र सरपंचपदासाठी दिपाली कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा नावाची सरपंचपदी वर्णी लागली.प्रास्ताविक ग्रामसेवक समीर ठिकपुर्ले यांनी केले .या निवडीवेळी नूतन सरपंच दीपाली कांबळे व जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांचा सत्कार माजी सरपंच बाळाबाई पाटील व लक्ष्मण कुपले यांच्या हस्ते करण्यात आलाया निवडीवेळी उपसरपंच अब्दुल पखाली, सदस्य गजानन सोनार ,मनोज नारकर ,बाळाबाई पाटील ,शोभा पाटील ,लक्ष्मण कुपले,मारूती पाटील, भागोजी पाटील, आनंदा पाटील, तलाठी विजय पाटील व अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कांबळे यांनी मानले.