E

June 7, 2023

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

कोरोना महामारीनंतर विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसण्यासाठी प्रांजली अर्बन निधी संस्था कार्यरत राहील – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी

कोरोना महामारीनंतर विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसण्यासाठी प्रांजली अर्बन निधी संस्था कार्यरत राहील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. २५ हजार रुपये कर्जाच्या २० छोट्या व्यवसायिकांच्या कर्जाचे पुर्णतः व्याजाची जबाबदारी घेत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
इस्लामपूर बस स्थानकासमोर सिध्दनाथ बिझनेस सेंटरमध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने सुरू झालेल्या प्रांजली अर्बन निधी लिमिटेड या मिनी बँकेच्या शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार गोपीचंद पडळकर होते
यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.पाटील म्हणाले,”प्रांजली अर्बन निधी नव्याने सुरू झालेली मिनी बँक राज्यातील कार्यकर्त्यांना प्रेरणा व दिशा देणारी ठरेल. कोरोनानंतर आर्थिक अडचणी असताना सामान्य माणसांना या संकटातुन सावरण्यासाठी या मिनी बॅकेचा प्रयत्न राहील, चांगले कर्जदार मिळणे हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोविडच्या परिस्थितीत देशपातळीवर आर्थिक घडी सुधारण्यासाठी मदतीची आवश्यकता होती. केंद्र सरकारने उद्योग ,लघुउद्योगांसह, शेतकऱ्यांना भरीव मदत केली. शेतकर्‍यांच्या विकासासाठी दहा हजार कंपन्यांची घोषणा केली गेली आहे.त्यातील ७०० कंपन्या महाराष्ट्रात सुरू होत आहेत. यातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.”
नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्यांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड काळात चांगल्या सोयी उपलब्ध करुन दिल्या.नव्याने सुरू होत असणारा दूध संघ, ज्यूस प्रकल्प गरजूंना आधार ठरतील. कार्यकर्त्यांनी मिळून एकसंधपणे भाजपा पक्ष वाढवायला हवा.शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले,सहकार व लोकसहभागातुन उभा राहीलेल्या बॅका खर्‍या अर्थाने शेतकरी,उद्योजक व ग्रामीण अर्थकारण अधिक सक्षम करण्यासाठी असाव्यात हा हेतु आहे,मात्र मोठ मोठ्या कर्जदारामुळे अनेक बॅका मोडकळीस आल्या मात्र निशिकांत दादांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रांजली अर्बन निधी बॅक अत्यंत पारदर्शक पणे चालेल,भविष्यात आदर्श बॅक म्हणुन या बॅकेची ओळख निर्माण होईल.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील (दादा)म्हणाले” सामान्य नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रांजली अर्बन निधीची स्थापना केली आहे. यापूर्वी आर्थिक संस्था
नसल्याने कार्यकर्त्यांची कुचंबणा होत होती.कर्तबगार कार्यकर्त्यांना संचालक पद देऊन संधी दिली आहे.भविष्यात आदर्शवत दूध संघ उभारणार आहे.दोन लाख लिटर दूध संकलन केले जाईल. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योग निर्मीतीसाठी मदत करुन त्यांना अर्थिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. मुक्त गोठा, चाऱ्याचे व्यवस्थापन याबाबत अभिनव प्रयोग करून दहा हजार कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.दूध संघाच्या माध्यमातून सात हजार महिलांच्या कुटुंबांचे आर्थिक नियोजन उंचाविण्याचा प्रयत्न राहणार आहे
सातशे बेडच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून तालुक्याला चांगल्या आरोग्य सेवा सुविधा दिल्या आहेत. साखर कारखानदारीच्या निमित्ताने सामान्य शेतकऱ्यांना अडचणी निर्माण करणाऱ्या पासून सुटका करण्यासाठी ऊसापासून ज्युस ची निर्मिती करण्याकडे कल आहे. यासाठी नव्या उद्योगाची सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ते म्हणाले केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न आहे. प्रांजली अर्बन निधीच्या माध्यमातून दोन वर्षात दोनशे कोटी रुपयांच्या ठेवी करण्याचा प्रयत्न आहे.समाजाच्या हितासाठी आणि उन्नतीसाठी कार्यरत राहू.
चेअरमन संदीप सावंत यांनी स्वागत व प्रस्तावित केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन राहुल पाटील यांनी आभार मानले.
यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे,माजी जि.प.सदस्य रणधीर नाईक,सम्राट महाडीक,लिलाधर पाटील,आष्ट्याचे वैभव शिंदे,नगरसेवक वैभव पवार,शकील सय्यद,नगरसेविका मंगल शिंगण,सुप्रिया पाटील,कोमल बनसोडे,प्रतिभा शिंदे,माजी नगरसेवक एल.एन.शहा,भास्कर कदम,वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष प्रसाद पाटील,वाळवा तालुका महीला भाजपा आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई मटकरी,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील,संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे,दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,विकास पाटील,गजानन पाटील,अभिजीत पाटील,बागणीचे सरपंच संतोष घनवट,येडेमच्छिंद्रचे सरपंच गणेश हराळे,उपसरपंच पै.रणजीत पाटील,हुबालवाडीचे उपसरपंच मधुकर हुबाले,शरद पाटील,रावसाहेब पाटील,प्रविण माने,दिनानाथ लाड,संजय भागवत,प्रविण परीट,अक्षय कोळेकर,अजित पाटील,अक्षय पाटील,फिरोज पटेल,रणजीत माने आदिसह अन्य मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते,उद्योजक उपस्थित होते.

You may have missed

1 min read

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.