The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध
कोविड सेंटर मधील मेडिकल दुकानाशी संपर्क करा -सहायक आयुक्त (औषधे) एन. पी. भांडारकर

  • सांगली प्रतिनिधी
  • सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोना उपचारासाठी Remdesivir इंजेक्शन ची गरज लागते. हे इंजेक्शन कोविड हॉस्पिटल संलग्न औषध दुकानात उपलब्ध आहे. रूग्णांनी औषध घेण्यासाठी जाताना सोबत रूग्णांचे आधार कार्ड / रूग्णांच्या कोविड-19 रिपोर्ट / ॲडमिट हॉस्पिटलची चिठ्ठी (Prescription) तसेच औषध घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड व फोन नंबर ही कागदपत्रे सोबत ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) एन. पी. भांडारकर यांनी केले आहे.
    रेम‍डिसिव्हीर इंजेक्शनसाठी पुढील कोविड सेंटर मधील मेडिकल दुकानाशी संपर्क करावा. मे. साई मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 7666057271), मे. प्रकाश मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स इस्लामपूर (मो.नं. 8605078750), मे. आरोग्यम सिर्नजी फार्मसी सांगली (मो.नं. 8208799105 / 7438950053), मे. ओजस मेडिकल सांगली (मो.नं. 9096887521), मे. सेवासदन मेडिकल मिरज (मो.नं. 8830271702), मे. पार्थ मेडिकल बामणोली (मो. नं. 9049997911), मे. उमेश मेडिको कुपवाड (मो. नं. 9270972015), मे. शिवशांती मेडिकल विश्रामबाग सांगली (मो.नं. 9130334077), मे. अभय मेडिको विश्रामबाग सांगली (मो.नं. 9325512429), मे. इंदु मेडिको प्रा. लि. सांगली (मो.नं. 9404986963), मे. भारती मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स सांगली (मो.नं. 9623239099), मे. जनऔषधी मेडिकल स्टोअर्स प्रकाश हॉस्पीटल इस्लामपूर (मो. नं. 8208032236), मे. ओम श्री मेडिकल विटा (मो. नं. 9284434884), मे. श्री. सेवा मेडिकल आटपाडी (मो.नं. 9503794004), मे. आधार मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 7719996596), मे. मंगलमूर्ती मेडिकल जत (मो. नं. 7499380180), मे. तासगाव कोविड मेडिकल सेंटर तासगाव (मो.नं. 9860525404), मे. पार्वती मेडिको तासगाव (मो.नं. 8421323000), मे. न्यू सुश्रूषा मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 9122916474), मे. पायल मेडिकल सांगली (मो.नं. 9822299408/8999570034), मे. बालाजी मेडिकल सांगली (मो.नं. 9545589797), मे. पार्श्व मे‍डिकल सांगली (मो.नं. 8446240280), मे. क्रांती मेडिकल सांगली (मो.नं. 9767090659), मे. उत्कर्ष मेडिको सांगली (मो.नं. 9421108558), मे. वीर मेडिकल सांगली (मो.नं. 9637690500), मे. नॅशनल मेडिकल कवठेमहांकाळ (मो.नं. 9665482077), मे. वानलेस हॉस्पीटल मेडिकल स्टोअर मिरज (मो.नं. 9503170969), मे. सदगुरू मेडिकल विटा (मो.नं. 9673337028), मे. लक्ष्मीनारायण मेडिकल विटा (मो.नं. 9403006480).
    अत्यावश्यक सेवेसाठी सहायक आयुक्त नि. प. भांडारकर (मो. नं. 9423106923) व औषध निरीक्षक वि. वि. पाटील (मो.नं. 9422034080) यांच्याशी संपर्क साधावा.

E

You may have missed

1 min read

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.