March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणे मिरजवाडी ता वाळवा येथे गावांतील युवकांनी  जवळपास 70 ते 80  वृक्षांची लागवड केली.

गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणे मिरजवाडी ता वाळवा येथील ग्रामपंचायतच्या  पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी लगत पडक्या जागेवर गावांतील युवकांनी  जवळपास 70 ते 80  वृक्षांची लागवड करून  आगळा वेगळा स्वातंत्र्यदिन साजरा केला यावेळी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली
सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील मिरजवाडी हे एक छोटेसे गाव लोकसंख्या 1500 ते 2000 गावातील युवकांनी आदर्श घ्यावे असे कार्य केले आहे देश स्वातंत्र्य झाल्या दिवशीचे निमित्त साधुन त्यांनी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या  मोकळ्या जाग्यावरती छान अशी बगीच्या करण्याचे ठरवले यासाठी त्यांनी वेगवेगळ्या झाडांची निवड केली तसेच त्यांनी या जागेमध्ये 70 ते 80 विविध जातीची झाडे लावली आहेत यामुळे मिरजवाडी ग्रामपंचायत व युवकांचे आदर्श इतर ग्रामपंचायतीने घेतला पहिजे
    जेष्ठ नेते अनिल गायकवाड याच्या मार्गदर्शनखाली मिरजवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच विपीन खोत ,तंटा मुक्ती अध्यक्ष तानाजी खोत ,जेष्ठ नागरीक वसंत सावंत ,पोलीस पाटील हरिदास पाटील ,दीपक पाटील ,अमित गायकवाड, चंद्रकांत साळुंखे व इतर मान्यवर सहकार्य मिळत आहे. तर
या बगीचा साठी संजय मेंगाणे,सुजित माने,शुभम सुतार,महेश सव्वाशे,स्वप्नील माने,संतोष मेंगाने,शुभम पाटील,सचिन खोत,यांनी विषेश मेहनत घेतले आहे

E