March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

टाेपला ‘एक गाव एक गणपती’
उपक्रम राबवुन पाेलिस प्रशासनास सहकार्य

टोप येथे एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याचा निर्णय येथील गणेशोत्सव मंडळे व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.यावेळी शिराेली पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरिक्षक किरण भाेसले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपसरपंच शिवाजी पाटील, ग्रामविकासआधिकारी डि.आर.देवकाते प्रमुख उपस्थित हाेते.


कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील टोप येथे एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याचा निर्णय येथील गणेशोत्सव मंडळे व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.शिराेली पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरिक्षक किरण भाेसले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपसरपंच शिवाजी पाटील, ग्रामविकासआधिकारी डि.आर.देवकाते प्रमुख उपस्थित हाेते.
टोप मध्ये साधारण 40 गणेशोत्सव मंडळे असून या मंडळांची गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. या सर्व मंडळांच्या बैठकीत एम आय डी सी शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी कोरोना महामारीच्या पार्शवभूमीवर शासनाने गणेशोत्सव साठी घातलेल्या जाचक अटी पाहता सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे जवळजवळ दुरापास्त असल्याने पोलीस प्रशासनास सहकार्य करून एक गाव एक गणपती उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले.या आवाहनास प्रतिसाद देत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याचे मान्य केले.तसे पत्रही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनास दिले आहे.
बैठकीस उपसरपंच शिवाजी पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील,राजू कोळी,संग्राम लोहार,बाळासाे काेळी, कृष्णात शिंदे, सुनिल काटकर, प्रकाश पाटील, पोलीस पाटील महादेव सुतार ग्रामविकास अधिकारी डी आर देवकाते पाेलीस अविनाश पाेवार यांचेसह गावातील मंडळांचे पदाधिकारी उपस्थित हाेते.स्वागत विठ्ठल पाटील यांनी केले.आभार मयुर पाटील यांनी मानले.

E