The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

देशाच्या संरक्षणासाठी बलिदानास सज्ज व्हा.-अण्णासाहेब डांगे
माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य

आष्टा प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री माननीय श्री अण्णासाहेब डांगे (आप्पा) म्हणाले, आपल्या देशावर पाकिस्तान कायमच सरहद्दीवरती कुरघुड्या करीत असतो पण आता चीन हा देश सुद्धा बोलतो एक व करतो एक अशा प्रकारे आपल्या देशाशी तो वागत आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार व देशाचे संरक्षण खाते सक्षम असून आपले सैनिक ही चीनला धडा शिकवण्यासाठी वाट पाहत आहेत. आज या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपण शपथ घेऊया की, वेळ पडल्यास देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देण्यास आपणही तयार आहोत.
या वेळी आष्टा नगरीचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. सतीश बापट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी आष्टा येथे संस्थेचे संकुल निर्माण करून या शहरावर खूप मोठे उपकार केले आहेत. कारण एकेकाळी या मैदानावर टोळधाडीच्या नियंत्रणासाठी शासकीय विमाने औषध फवारण्यासाठी उतरायची, आज याच माळावर अण्णासाहेब डांगे यांनी एरोनॉटिकल इंजिनीअरिंग च्या माध्यमातून कायमस्वरूपी विमान उतरवून ठेवले आहे, हे आपणा सर्वांचे भाग्य होय. कोरोना परिस्थितीला मात देण्यासाठी सोशल डिस्टंगशिंगचे पालन करून हा राष्ट्रीय उत्सव आपण साजरा करत आहोत याचा अभिमान आपण सर्वांनी बाळगला पाहिजे. या वेळी संस्थेचे कार्यकारी संचालक प्रो. आर. ए. कनाई यांच्या हस्ते मा. अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी प्रसिद्ध धनवंतरी डॉ. सतीश बापट यांचा तर मुंबईचे पोलीस निरीक्षक श्री संजय पुजारी यांचा पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सुभाष पाटील यांनी सत्कार केला यावेळी मेडिकल कॉलेजचे डॉ. सत्येन्द्र ओझा इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. विक्रम पाटील, व्यवस्थापक सुनिल शिणगारे यांच्यासह सर्व शाखांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके संयोजन संस्थेचे व्यवस्थापक सुनील शिनगारे, डॉ. एन. डी. सांगले, अशोक घोरपडे, रघुनाथ बोते, अजित पाटील, विजय पाटील, अधिक कुठे, अजित माने, आप्पासाहेब आळुळे, इत्यादींनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. के. पाटील यांनी केले. तर आभार श्री. संजय चव्हाण यांनी मानले.

E

You may have missed

1 min read

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.