वाळवा प्रतिनिधी
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 चा 38 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दिनांक 8.11.2020 रोजी सकाळी 8.00 वा.संपन्न झाला. यावेळी मा.वैभवकाका नायकवडी म्हणाले, क्रांतिवीर अण्णांनी कारखाना स्थापनेपासून सहकार क्षेत्रात साखर उद्योगात रात्रपाळी ऊस तोड, ऊस तोडणी कामगारांचेसाठी पक्की घरे, त्यांचे मुलांसाठी साखर शाळा, सणासाठी साखर, दिवाळीचा फराळ, वैद्यकिय मदत, कामगारांचेसाठी 1985 पासून वेतन मंडळाप्रमाणे पगार, जास्तीत जास्त बोनस, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणेची परंपरा सुरू केली. साखर उद्योगात हुतात्मा पॅटर्न म्हणून आपला कारखाना नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यावर्षी शासनाच्या धोरणाप्रमाणे गतवर्षी आलेल्या ऊसास एफ.आर.पी.प्रमाणे प्र.मे.टन रु.2968/- ऊस बिल अदा केले आहे. आपल्या कारखान्याने शेतकऱ्यांची तसेच कामगारांची थकीत देणी ठेवलेली नाहीत. साखर उद्योग अडचणीत आहे. 2019-20 गळीत हंगामामध्ये केंद्र व राज्य शासनाकडे शासनाने जाहीर केलेल्या साखर निर्यात अनुदान येणेबाकी रु.22.63 कोटी, सॉफ्ट लोन व्याज सवलत रु.2.74 कोटी व बफर स्टॉक क्लेम येणे रक्कम रु.5.18 कोटी अशी एकूण शासनाकडून रु.30.57 कोटी येणेबाकी आहे. ही रक्कम वेळेत शासनाने अदा केल्यास आपल्या कारखाना आर्थिक अडचणीची सोडवणूक होणार आहे.
गळीत हंगाम 2020-21 मध्ये सर्वच शेतकऱ्यांनी ऊस लागण मोठ्या प्रमाणात केली आहे त्यामुळे या सिझनमध्ये विक्रमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे उत्पादित होणाऱ्या साखरेचा बफर स्टॉक व साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा. इथेनॉल प्रकल्प उभा करणेसाठी शासनाने आर्थिक मदत करावी. साखर विक्री कोठा पध्दतीने होते त्याचे करोडो रुपयांचे व्याज विनाकारण कारखान्याना भरावे लागते. त्यासाठी शासनाने कमी व्याज दराने साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. साखर उद्योगामुळे केंद्र व राज्य शासनास कर स्वरूपात लाखो रुपये मिळतात. तसेच ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साखर उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने वरील सर्व बाबीचा विचार करून सर्व साखर कारखान्यांची देय रक्कम वेळेत देऊन हा उद्योग स्वालंबी बनविणेसाठी कायम स्वरूपी योग्य ते धोरण घ्यावे.
आपल्या हुतात्मा पॅर्टनची परंपरा कायम ठेऊ. हुतात्मा कारखान्याची यशस्वी घोडदौड, शेतकरी कामगार, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, सर्व सभासद,संचालक,कार्यकर्ते यांच्या एकत्रित कामामधून येणारा सिझन यशस्वी करू या. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण वाढलेले आहे त्या सर्व ऊसाचे गाळप आपण करून हा गळीत हंगाम यशस्वी करू या.
या कार्यक्रमाचे कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबुराव बोरगांवकर, संचालक आनंदराव सुर्यवंशी, मारूती पाटील, हेमंत कदम, माणिक कदम, आण्णाप्पा मगदूम, बळवंत जाधव, विनायक पाटील, शिवाजी अहिर, संताजी घोरपडे, संदिप पाटील, संजय इंगळे, चंद्रकांत पाटील, शंकर कापीलकर, हणमंत पाटील, विलास बाड, शिवाजी शिंदे, कारखान्याचे माजी चेअरमन महादेव कांबळे, हुतात्मा दूध संघाचे व्हा.चेअरमन भगवान पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, यशवंत बाबर, दिलीप पाटील हुतात्मा बझारचे चेअरमन दिनकर बाबर, अजित वाजे, महादेव माने, रामचंद्र पाटील, बबन हवलदार,हुतात्मा कारखान्याचे अधिकारी वर्ग, कर्मचारी उपस्थित होते.