March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा कार्यकारणी जाहिर

सांगली प्रतिनिधी

पैलवान ग्रुप महाराष्ट्र ची स्थापना कला, क्रीडा (कुस्ती),शैक्षणिक , सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली, महाराष्ट्रातील सर्व  पैलवान (पुरुष , महिला मल्ल) , वस्ताद , मार्गदर्शक, सल्लागार व हितचिंतकांची  राज्य कार्यकारणी जाहीर केली आहे  अशी महिती पैलवान ग्रुप महाराष्ट्र  राज्य  संस्थापक अध्यक्ष पै.विलास देशमुख व उपाध्यक्षपै.राजकुमार खरात यांनी दिली 
पैलवान ग्रुप महाराष्ट्र सांगली जिल्हा कार्यकारणी अशी पै.राम (भाऊ) मासाळ,सांगली  जिल्हा अध्यक्ष पै.विशाल दादा चौगुले ,सांगली  जिल्हा उपाध्यक्ष पै.संतोष (भाऊ) पुजारी सांगली  जिल्हा कार्याध्यक्ष पै.मनोहर (आण्णा) यादव,सांगली जिल्हा संघटक पै.सुनिल (भाऊ) परमने, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख पै.गजानन (नाना) सावंत, सांगली जिल्हा सल्लागार श्री.गजानन (दादा) शेळके, सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड केल्याची  नियुक्त पत्र देण्यात आलेपुढे पै.विलास देशमुख व उपाध्यक्ष पै.राजकुमार खरात म्हणाले गेले 3 वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना जवळपास 10 लाख रुपयांची मदत  करण्यात आली आहे नव्या पर्वाची सुरुवात केली आहे यामध्ये राज्यातील वरिष्ठ पैलवान आणि वस्ताद मंडळींना सोबत घेऊन स्व.गुरुवर्य पै खाशाबा जाधव यांचा वारसदार आणि पै राहुल आवारे यांच्या सारखा ऑलिम्पिक गेम्स चा प्रभळ दावेदार ह्याच महाराष्ट्राच्या मातीतून घडावा ह्या साठी पैलवान ग्रुप महाराष्ट्र ची स्थापना करण्यात आली आहे संपूर्ण राज्यभर या पैलवान ग्रुप च्या माध्यमातून पैलवान सही तर माध्यमातील युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम या ग्रुप मधून केले जाणार आहे यावेळी पै प्रमोद जाधव उपस्थिती होते 

E