March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

प्रकाश हाॅस्पिटलमधील डाॅक्टर्स व नर्स स्टाफ कोरोना लढाईतील खरे योध्दा:प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी पीपीई किट परिधान करुन रुग्णांशी साधला संवाद


आष्टा प्रतिनिधी

वाळवा ,शिराळा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या आजारावर कर्तव्य या नात्याने यशस्वी उपचार करणारे प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचे व्यस्थापन व हाॅस्पिटल मधील डाॅक्टर्स ,नर्स व सहकारी स्टाफ या कोरोना लढाईतील खरे योध्दा आहेत.असे मत वाळवा शिराळा विभागाचे प्रातांधिकारी नागेश पाटील यांनी व्यक्त केले तर या लढाईत एकीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असताना कोरोना रुग्णांसाठी प्रकाश हाॅस्पिटल हे आरोग्य मंदीर बनले असल्याची भावना अनेक रूग्ण व नातेवाईक यांनी प्रातांधिकारी यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.
प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे कोरोना बाधीत असलेले रुग्ण उपचार घेत आहेत,आज सायंकाळ सत्रात वाळवा शिराळा विभागाचे प्रातांधिकारी नागेश पाटील यांनी हाॅस्पिटल ला भेट दिली.यावेळी त्यांनी पीपीई किट परीधान करुन हाॅस्पिटल मधील सोयीसुविधेची माहीती करुन घेऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसापासुन प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर चे संस्थापक व उरूण- इस्लामपुर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या आलेखाची गंभीरता पाहुन कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी हाॅस्पिटल सुरु केले .यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या समितीने हाॅस्पिटलमधील सोयीसुविधा पहाणी करून कौतुक केले होते.
आज प्रातांधिकारी नागेश पाटील यांनी आजपर्यतच्या कोरोना रूग्णांच्यावरील उपचाराबाबतची माहीती घेऊन हाॅस्पिटलमधील रूग्णांना आरोग्यसेवेबरोबर इतर देत असलेल्या सुविधेची माहीती थेट पीपीई कीट परीधान करून वार्ड मध्ये समक्ष रूग्णांना भेटुन संवाद साधला यावेळी रूग्णांनी उत्तम आरोग्य सेवेबरोबर कोरोना हा भयंकर आजार नसुन तुम्ही लवकर बरे व्हाल असा जिव्हाळ्याचा आधार येथील डाॅक्टर व नर्स देत आहेत,जेवणाची ही काय काळजी नाय निशिकांतदादा हे या संकटात देवासारखे भेटल्यात म्हणुन आम्हाला आधार हाय बघा अशा शब्दात ही अनेक रूग्णांनी आपल्या भावना प्रातांधिकारी नागेश पाटील यांच्याकडे व्यक्त केल्या.
यावेळी प्रातांधिकारी नागेश पाटील यांनी प्रकाश हाॅस्पिटलमधील सेवेबद्दल समाधान व्यक्त करुन या संकट काळात वाळवा शिराळा तालुक्यातील पहीले कोरोना रुग्णावरील उपचारासाठी सुरु केलेले हाॅस्पिटल हे प्रशासन व आरोग्य यंत्रनेवरील ताण कमी करणारे ठरले असुन सध्याची वाढती संख्या ही पुन्हा आरोग्य व प्रशासन यंत्रणेवरील ताण वाढविणारी आहे.आपण करत असलेले काम हे मोठे पुण्याई चे असुन सन्मानीय निशिकांतदादा ,डाॅक्टर्स ,नर्स स्टाफ व सर्व स्टाफचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे शेवटी प्रातांधिकारी नागेश पाटील म्हणाले.
रुग्णाने प्रातांचे मानले आभार
यावेळी रूग्णांशी संवाद साधताना रूग्णांना प्रांताधिकारी नागेश पाटीलसाहेब आपणांस भेटायला व आपली विचारपुस करायला आलेत असे डाॅक्टर्स सांगत होते यावेळी एका रूग्णांने चक्क वाकुन नमस्कार करून आपण इथंपर्यत येऊन आमची चौकशी केलीत आभारी आहे बघा साहेब …बरं वाटलं बघा असे बोलुन सदरचा रूग्ण भावनिक झाला.

E