The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

प्रकाश हाॅस्पिटल मधील उपचारानंतर आज तीन रुग्ण कोरोनामुक्त हाॅस्पिटल व्यवस्थापनाचे मानले आभार

प्रकाश हाॅस्पिटल मधील उपचारानंतर आज तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले:हाॅस्पिटल व्यवस्थापनाचे मानले आभार
ऊरूण – इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये कोरोना विरूध्द लढा देत असलेल्या तीन रुग्णांनी आज कोरोना वर मात केली.यामध्ये सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष,कवठेपिरान व कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपुर येथील प्रत्येकी एक रूग्णाचा यामध्ये समावेश आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील ४२ वर्षीय पुरुषा ला कोरोना ची लागण झाल्याने दि.१३ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष येथील ७३ वर्षीय महीलेचा दि.१३ ऑगस्ट रोजी कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर कवठेपिरान येथील ४२ वर्षीय पुरुषचा दि.१४ ऑगस्ट रोजी कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने उपचारासाठी त्याच दिवशी दाखल करुन घेण्यात आले होते.वरील तिन्ही रुग्णांवर ऊरुण-इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे यशस्वी उपचार करण्यात आले.उपचारानंतर तिन्ही रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी तिन्ही रुग्णांना गुलाबपुष्प देऊन व फुलांच्या पाखळ्यांचा वर्षाव करत प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील तज्ञ डाॅक्टर,नर्सिग स्टाफ यांनी निरोप दिला.तिन्ही रुग्णांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसुंडुन वहाताना दिसत होता.यावेळी हाॅस्पिटल चे संस्थापक व ऊरूण – इस्लामपुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांचे व सर्व तज्ञ डाॅक्टर व नर्सिग स्टाफ यांचे तिन्ही रूग्णांनी आभार मानले व हाॅस्पिटल मधील सर्व सोयीसुविधेबाबत समाधान व्यक्त केले.

E

You may have missed

1 min read

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.