प्रकाश हाॅस्पिटल मध्ये आज नव्याने तीन कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल
आज शनिवारी दिवसभरात उरुण- इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये उचारासाठी पुणे,इस्लामपुर व बावची येथील प्रत्येकी एक असे तीन कोविड पाॅझिटीव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती प्रकाश हाॅस्पिटल व्यवस्थापनाने दिली.
डांगे चौक पुणे येथुन ५६ वर्षीय पुरुष आज पहाटे ४ वाजता उपचारासाठी दाखल झाला.त्याचा काल कोविड रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला.टकलाईनगर कापुसखेड रोड इस्लामपुर येथील ८० वर्षीय पुरूष सकाळी १०:४६ मिनिटांनी दाखल झाला यांचा आजच कोविड रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला तर बावची येथील ७५ वर्षीय सायंकाळी ५ वा.दाखल झाला.त्याचा ही आजच कोविड रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला.
वरील सर्वाच्यावर उपचार सुरु करण्यात आले असुन पुर्वीचा एक व आजचे तीन असे एकुन चार कोविड पाॅझिटीव्ह रुग्णांवर उपचार प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे सुरु आहेत.येथील सर्व ॲडमिट रुग्णांवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुरु आहेत.यामुळे कोविड रुग्णांवर मोफत उपचार होणार असल्याची माहीती हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिली.