March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

प्रभु श्रीराम मंदीर भुमीपुजन निमित्ताने इस्लामपुर शहरासह वाळवा तालुक्यात लाडु,साखर वाटप

आष्टा प्रतिनिधी

प्रभु श्रीराम मंदीर भुमीपुजन निमित्ताने इस्लामपुर शहरासह वाळवा तालुक्यात लाडु,साखर वाटप
गेल्या अनेक दशकापासुन सुरु असलेल्या लढ्याला यश आल्याने व आयोध्देत प्रभु श्रीराम मंदीर उभारण्याच्या भुमीपुजन समारंभा निमित्ताने संपुर्ण देशभर उत्साहाचे वातावरण असुन अनेक ठिकाणी लाडु,साखर,पेढे वाटण्यात आले तर अनेक घरावर गुढ्या उभारुन,भगवा ध्वज फडकवत,अंगणामध्ये रांगोळी काढुन,विद्युत रोषणाई करून,फटाक्याची आताषबाजी करत हा उत्सव मोठ्या उत्साहाने इस्लामपुर शहरासह वाळवा तालुक्यातील विविध गावांत साजरा करण्यात आला.
उरुण-इस्लामपुर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी त्यांच्या घरी प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचं पुजन करुन,घरावर भगवा ध्वज फडकुन आजचा आयोध्देत होणार्‍या प्रभु श्रीराम मंदीराच्या भुमीपुजन सोहळ्याचे स्वागत केले.शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात प्रभु श्रीराम प्रतिमेचं पुजन करण्यात आले,राम रक्षा स्त्रोत्र म्हणुन साखर वाटप करण्यात आली,सायंकाळच्या वेळी कार्यालयाभोवती दिप पेटवुन परीसर प्रकाशमय केला होता.यावेळी माजी नगरसेवक सुभाष शिंगण यांनी आयोध्देत राममंदीर व्हावे यासाठी अनेक वेळा लढ्यात सहभाग घेतला होता,त्यांना अटक ही करण्यात आली होती त्या आठवणीना व योगदान बद्दल त्यांनी आपल्या अनुभवांना उजाळा दिला.त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी गौरवव्दार व्यक्त केले.यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर हुबाले,संजय हवलदार,संदीप सावंत,प्रविण परीट,सुभाष जगताप,सुयश पाटील,किरण गवळी,नंदकुमार शिंदे आदिसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.बहे येथील प्रभु श्रीराम यांचे मंदिर विद्युत रोषणाई ने सुशोभित करण्यात आले असुन पहाटे मंदिरातील प्रभु श्रीराम मंदिरातील मुर्ती ची पुजा करण्यात आली,यावेळी वाळवा तालुका भाजपाचे ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रसाद पाटील (दादा) व भाजपाचे सरचिटणीस यदुराज थोरात यांच्यासह त्याचे कुटुंबिय उपस्थित होते. परीसरात भगवे ध्वज फडकुन परीसर प्रसन्न करण्यात आला होता.वाळवा तालुक्यातील अनेक गावांत घरा घरावर गुढी उभा करुन,भगवा ध्वज फडकवुन,रांगोळी काढुन,साखर,पेढे,लाडु वाटुन प्रभु श्रीराम मंदिर भुमीपुजनाचे स्वागत केले.

E