इस्लामपुर / प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान सन्मानीय नरेंद्रजी मोदी यांच्या सुरक्षाविभागात इस्लामपुर शहरातील कमांडो आप्पासाहेब कांबळे यांच्या सेवानिवृत्ती नंतर इस्लामपुर शहरातील भाजपा वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे अध्यक्ष अशोकराव खोत यांच्या हस्ते कमांडो आप्पासाहेब कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आप्पासाहेब कांबळे यांनी त्याच्या सेवेतील अनेक अनुभव सांगितले,मोदीसाहेबांच्या कामाची कार्यपध्दत ही जगात भारत देशाला पहिल्या क्रमांकावर आणणारी आहे.मला त्याच्यासोबत काम करण्याची मिळालेली संधी व ते क्षण मी कधी ही विसरू शकणार नाही असे मत यावेळी आप्पासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा कामगार आघाडीचे शहरध्यक्ष सुयश पाटील,युवा नेते प्रविण परीट,अक्षय कोळेकर,वजीर डाके,संतोष कबुरे,तेजस रास्कर आदि मान्यवर उपस्थित होते.