
वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ मनीषा जाधव व वृत्तपत्र द वाळवा क्रांतीच्या उपसंपादक सौ सुजाता शेळके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी संपादक गजानन शेळके, माजी नगरसेवक सतीश माळी, प्रभाकर जाधव, युवा नेते दादासो शेळके, आष्टा दक्षिण भाग सोसायटीचे माजी संचालक शामराव शेळके,उपसंपादक खंडु चव्हाण न्यूज चे उपसंपादक दत्तराज हिप्परकर सह श्रीवर्धन शेळके ,प्रतिक शेळके उपस्थित होते
यावेळी मनीषा जाधव म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास प्रत्येक स्त्रियांनी युवकांनी वाचला पाहिजे एक स्त्री काय करू शकते हे या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी दाखवून दिले आहे आजच्या युगात अशा स्त्रिया तयार झाल्या पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले
सुजाता शेळके म्हणाल्या वृत्तपत्र द वाळवा क्रांतीच्या माध्यमातून महिलांच्या वर अनेक लेख लिहिले जात आहेत तसेच वृत्तपत्र वाळवा क्रांती मध्ये महिलांच्या साठी विशेष लेखमाला सुरू होणार आहेत या लेखमालेतून महिलांचे आरोग्य सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी लेखमाला सुरू राहणार आहे