December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयात लोकनेते राजारामबापू पाटील यांची 101वी जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती, व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी साजरी .

वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयात लोकनेते राजारामबापू पाटील यांची 101वी जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती, व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त पोखर्णीचे उद्योग सतीश पाटील ,राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव दादा शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी संपादक गजानन शेळके ,नगरसेवक सतीश माळी, प्रभाकर जाधव, अमाण्णा वसगडे ,युवा नेते दादासो शेळके ,रणजीत पाटील, कनिष्ठ अभियंता आकाराम शेळके, श्रीवर्धन शेळके ,प्रतिक शेळके, आष्टा प्रतिनिधी कुमार मुदुर यावेळी उपस्थित होते
यावेळी वैभव दादा शिंदे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कविता गीते आजकालच्या युवकांसाठी महत्वाच आहे प्रत्येक युवकांनी अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र वाचले पाहिजे तसेच अण्णा भाऊ साठे समजून घेतले पाहिजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे
सतीश पाटील म्हणाले की लोकनेते राजारामबापू पाटील यांनी पदयात्रा द्वारे राज्यभर एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी उभा केली होती पदयात्रेतुन चळवळ उभा केली होती यामुळे त्यांना लोकनेते ही पदवी मिळाली बापूंच्या दूरदृष्टीमुळे राज्यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा सुजलाम सुफलाम झाला आहे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे विचार युवकांनी आत्मसात केले पाहिजे
संपादक गजानन शेळके यांच्या हस्ते वैभव शिंदे व उद्योजक सतीश पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

E

You may have missed