March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्राथमिक आश्रमशाळा व अण्णासाहेब डांगे कनिष्ठ महाविद्यालय (आश्रमशाळा) आष्टा येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी सत्यजित यादव याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश


संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्राथमिक आश्रमशाळा व अण्णासाहेब डांगे कनिष्ठ महाविद्यालय (आश्रमशाळा) आष्टा येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी सत्यजित यादव याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश
आष्टा प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्राथमिक आश्रमशाळा आष्टा या आश्रम शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण व मा. अण्णासाहेब डांगे कनिष्ठ महाविद्यालय (आश्रमशाळा) आष्टा येथे इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावी पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेतलेला विद्यार्थी सत्यजित मदन यादव यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 801 क्रमांकाने रँक मिळवून यश संपादन करून संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्राथमिक आश्रम शाळा, आष्टा व मा. अण्णासाहेब डांगे कनिष्ठ महाविद्यालय (आश्रमशाळा) व स्वतःच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे अधिक माहिती देताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालांमध्ये संस्थेच्या माध्यमिक व कनिष्ठ आश्रमशाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून ते आपल्या उज्वल निकालाच्या परंपरेत सातत्य ठेवत आहेत. तसेच प्राथमिक आश्रमशाळेमध्ये सन 1997 पासून इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण व त्यानंतर सन 2008 ते 2010 या कालावधीमध्ये इयत्ता अकरावी व बारावीचे महाविद्यालय शिक्षण घेणारा विद्यार्थी श्री सत्यजीत मदन यादव याने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश संपादन करून या आश्रमशाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे व गुणवत्तेचे हे फलित असल्याचे दाखवून दिले आहे. हे यश संपादन करून श्री. सत्यजीत यादव यांनी व्यक्तिगत स्वतःच्या तसेच संस्था व आश्रमशाळेच्या कर्तृत्वाची यशोपताका महाराष्ट्रात फडकवली आहे.या यशाबद्दल श्री सत्यजीत यादव यांचा संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने व्यवस्थापक श्री. सुनील शिनगारे, मुख्याध्यापक रघुनाथ बोते व शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उत्तम यश मिळाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी सत्यजित मदन यादव, अविरत कष्ट घेणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब डांगे (आप्पा), उपाध्यक्ष श्री. संपतराव पाटीलसाहेब, सचिव श्री. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाईसर विठ्ठलराव मुसाईसर, विश्वनाथ डांगे (बापू), सुकुमार लवटेसर व सत्तु ढोले (मामा) यांना धन्यवाद देत आहेत.

E